मढ येथे दोन बोटींना भीषण आग
घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
मालाड, ता. ८ (बातमीदार ) : मालाड पश्चिमच्या मढ येथील तळपाशा धक्क्याजवळ शुक्रवारी (ता. ८) लागलेल्या आगीत दोन बोटी जळून खाक झाल्या. दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीदरम्यान बोटीजवळ कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तळपाशा धक्क्यावर उभी असलेली ‘ओंकार’ (आयएनडी/एमएच २ एमएम १५५०) या बोटीला अचानक आग लागली. पाहताच क्षणी आगीने भीषण स्वरूप घेते. धक्क्यावर सुटलेल्या वाऱ्यामुळे ही आग इतरत्र पसरत गेली व काही वेळेत ओंकार बोटीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या बोटीलाही आगीच्या झळा बसल्या. परिणामी दोन्ही बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नसून याप्रकरणी तपास सुरू आहे. या घटनेत ओंकार बोटीचे मालक मितेश कोळी व रुपम नंदकुमार कोळी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या दोन्ही बोटींच्या मालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.