मुंबई

बकरी ईद सणासाठी देवनार पशुवधगृह सज्ज

CD

बकरी ईद सणासाठी देवनार पशुवधगृह सज्ज
पालिकेने पुरविल्या नागरी सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः बकरी ईद सणानिमित्त देवनार पशुवधगृहात विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.
सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, वाहनतळ, उपाहारगृह, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य, कीटकनाशक, तक्रार निवारण कक्ष आदी सुविधा पालिकेने पशुवधगृहात पुरविल्या आहेत. १७ ते ३० मे २०२६ या कालावधीत देवनार पशुवधगृह येथे म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे. येत्या २८ ते ३० मे दरम्यान पालिका क्षेत्रात एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी धार्मिक पशुवध करावयाचा असल्यास त्याच्या परवानगीकरिता अर्ज करण्यासाठी पालिकेच्या वतीने यंदा MyBMC मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना ॲपवर नोंदणी करावी लागेल. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक पशुवध धोरणानुसार, म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे, असेही पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.
...
मदतसेवा क्रमांक
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित सहाय्य मिळविण्यासाठी ९०७६०००४८१, ९०७६०००४८२, ९०७६०००४८३, ९०७६०००४८४ हे समर्पित मदतसेवा क्रमांक उपलब्ध केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT