मुंबई

फुफुसावरील शस्त्रक्रियेनंतर बेडवर बसून युगने दिली दहावीची परीक्षा

CD

फुप्फुसावरील शस्त्रक्रियेनंतर बेडवर बसून परीक्षा
युग चितालियाला ८५.२० टक्के गुण

मुंबई, ता. ८ ः दहिसर येथील युग चितालियाने फुप्फुसावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेडवर बसून दहावीच्या गणिताचा पेपर देत दहावीच्या परीक्षेत तब्बल ८५.२० टक्के गुण मिळवले.
दहावीच्या परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच फुप्फुसाच्या आजाराने ग्रासलेले असताना वर्षभर परीक्षेसाठी केलेली तयारी वाया जाऊ नये असा निश्चय त्याने केला होता. यामुळेच त्याने बेडबर बसून परीक्षा दिली आणि त्याला हे यश आल्याची माहिती युगचे वडील विमल चितालिया यांनी दिली.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये युग दहावीत शिकत होता. दहिसर येथून तो या शाळेत येऊन शिक्षण घेत होता. मात्र, परीक्षेच्या काही दिवस अगोदर त्याला त्रास सुरू झाला होता. २३ फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाली; परंतु त्याची तब्येत १७ फेब्रुवारीपासून बिघडली होती. यामुळे पालकांनी त्याला यादरम्यान परीक्षेसाठी आलेले कांदिवली पूर्व येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल हे परीक्षा केंद्र बदलून मागितले होते. त्याला प्रतिसादही मिळाल्यानंतर दहिसर येथे घराच्या जवळचे परीक्षा केंद्र मिळाले. आजार सुरू असतानाच त्याने २३ ते २७ फेब्रवारीपर्यंतचे तीन पेपर या परीक्षा केंद्रावरून दिले. मात्र, ४ मार्चला त्याला खूपच त्रास झाल्याने त्याच्यावर ५ मार्च रोजी पहाटे ठाण्यातील डॉ. भानुशाली रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी युगकडून दहावीचे पुढील पेपर दिले जातील, यासाठीची आशा सोडून दिली होती. मात्र, शाळेने त्याला पेपर लिहिण्यासाठी डॉक्टर परवानगी देतील काय, अशी विचारणा केली आणि त्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिली. यानंतर राज्य शिक्षण मंडळाने पुढाकार घेत त्याला ठाण्यातील रुग्णालयात थेट बेडवरून बसून परीक्षा देण्यासाठी परवानगी दिली, पुढे एक लेखनिकही पुरविल्याने त्याने शस्त्रक्रिया झालेल्या दुसऱ्याच दिवशी ६ मार्चला असलेला गणिताचा पेपर बेडवरून दिल्याची माहिती त्याचे विमल चितालिया यांनी दिली.
...
तातडीने निर्णय!
युगचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तातडीने निर्णय घेण्यात आला. त्याला बेडवरून परीक्षा देण्यासाठी सर्व यंत्रणा पुरविण्यात आली. लेखनिक देण्यात आला. यामुळे त्याला ही परीक्षा सहजपणे देता आली आणि त्याने त्याला चांगले यश मिळाल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT