मुंबई

४१ वर्षांनंतर दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण

CD

४१ वर्षांनंतर दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण
६३ वर्षीय लता गमरे यांची प्रेरणादायी यशोगाथा

मुंबई, ता. ८ : जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय कधीच आड येत नाही, याचे उदाहरण म्हणजे संतोषनगर, आरे कॉलनी येथील ६३ वर्षीय लता गमरे या होय. तब्बल ४१ वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरत दहावीची परीक्षा ५०.५० टक्के गुणांसह यश संपादन केले.

लता गमरे यांनी १९८४-८५ या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा दिली होती; मात्र त्या वेळी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. त्यानंतर संसार, जबाबदाऱ्या आणि काळाच्या ओघात शिक्षण मागे पडले; मात्र त्यांच्या मनात दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न कायम होते, अखेर ४१ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा पुस्तके हातात घेत शिक्षणाची नवी सुरुवात केली. गोरेगाव येथील संतोषनगर इव्हिनिंग लर्निंग सेंटर येथे त्यांनी मराठी माध्यमातून पुन्हा दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीला एवढ्या मोठ्या शैक्षणिक खंडामुळे त्यांच्या मनात भीती, संकोच आणि आत्मविश्वासाचा अभाव होता, विशेषतः इंग्रजी आणि गणित या विषयांची त्यांना मोठी भीती वाटत होती. ‘या वयात पुन्हा अभ्यास जमेल का?’ असा प्रश्न त्यांना सतावत होता.

मासूम संस्थेचे प्रोत्साहन
दरम्यान, मासूम संस्थेशी समुदाय सर्वेक्षणादरम्यान त्यांची ओळख झाली. या वेळी त्यांना पुन्हा शिक्षणासाठी प्रेरित करण्यात आले. संस्थेमार्फत त्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, अभ्यास साहित्य तसेच परीक्षेसंदर्भातील खर्चाची मदत देण्यात आली. नियमित वर्गांसोबत रविवारी अतिरिक्त मार्गदर्शन वर्गही घेण्यात आले. केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी सातत्याने नैतिक पाठबळ, वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्‍याचे गमरे यांनी सांगितले.


मला नेहमीच माझे शिक्षण पूर्ण करायचे होते; पण संधी मिळाली नाही. आता मिळालेल्या पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मला माझे स्वप्न पूर्ण करता आले आणि आता मी माझ्या नातवंडांना अभ्यासात मदत करू शकेन.
- लता गमरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT