मुंबई

नामुष्कीनंतर महायुती सावध

CD

नामुष्कीनंतर महायुती सावध
‘त्या’ प्रस्तावाला सभागृहाची अखेर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा प्रस्ताव संख्याबळाअभावी सभागृहात नामंजूर झाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली होती. तो प्रस्ताव आज सभागृहात बहुमताने मंजूर झाला. यात भाजप महायुतीला ११२, तर विरोधकांना ७९ मते मिळाली. महायुतीने आज प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव ३० एप्रिलला नामंजूर करण्याची नामुष्की ओढवली होती. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि महापालिकेतील वरिष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली होती. शुक्रवारी महापालिका सभागृहात नियमित कामकाज म्हणून वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला. कोणताही धोका नको, यासाठी भाजपने नगरसेवकांना अगोदरच व्हीप काढला होता. त्यामुळे सर्व सत्ताधारी नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. अखेर या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने ११२ मते पडली. तर विरोधकांच्या बाजूने ७९ मते पडली. त्यामुळे प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्याचे महापौर यांनी जाहीर केले.

...तरीही नगरसेवक गैरहजर
पालिकेमध्ये २२७ नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे; परंतु भाजपच्या नगरसेविका केरकर यांचे निधन झाल्यामुळे सभागृहात २२६ नगरसेवक आहेत. या सत्ताधारी भाजप शिवसेनेचे १२१, तर विरोधकांचे १०५ नगरसेवक आहेत; पण मतदान प्रक्रियेच्या वेळी सत्ताधारी पक्षाचे नऊ नगरसेवक व विरोधकांचे २६ नगरसेवक अनुपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT