मुंबई

अकरावीच्या कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर

CD

अकरावीच्या कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर
८ मेपर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, ता. ८ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी नियमित कॅप फेरी-१चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, अर्जाचा भाग-१ भरून शुक्रवारपर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे.
...
असे आहे वेळापत्रक
- ८ ते २० मे शून्य फेरी
- विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग १ ऑनलाइन सादर करणे
- तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे
- हरकती/दुरुस्ती मागण्या, सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे
- विविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
- पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करणे
...
नियमित कॅप फेरी-१ अशी
१. २१ आणि २२ मे - नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरण्याची प्रक्रिया रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२. २३ ते २६ मे - कॅप फेरी १ची अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६ मे दरम्यान पार पडणार असून, २६ मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.
३. २६ ते २८ मे - प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. २९ मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून, ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
...
हेल्पलाइन
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे. ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT