मुंबई

हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेचे पालिका सभागृहात पडसाद

CD

हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेचे पालिका सभागृहात पडसाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाल्याची गंभीर बाब आज शिवसेना ठाकरे पक्षाने सभागृहाच्या निदर्शनास आणली. आज पालिका सभागृहात ८१ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली; मात्र स्मारकाची दुरवस्था झाली आहे, त्याची डागडुजी करण्याची प्रशासनाला गरज भासली नाही काय, असा सवाल विरोधी पक्षाने केला. स्मारकाच्या दुरवस्थेवरून पालिका सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली होती.

स्मारकाची दुरवस्था झाली असून ८१ हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेला सुशोभीकरण डागडुजी करण्याची गरज भासली नाही का, असा हरकतीचा मुद्दा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी आज सभागृहात उपस्थित केला. प्रभू यांच्या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देत काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी सत्ताधारी पक्षाला स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा विसर पडला, अशी टीका आझमी यांनी या वेळी केली. आझमी यांनी टीका करताच स्वतंत्र महाराष्ट्रासाठी चळवळ उभारली त्या वेळी गोळीबार झाला तो काँग्रेसच्या काळात झाला. त्यामुळे काँग्रेसने हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्याबद्दल बोलूच नये, असा घणाघात स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी काँग्रेसवर केला.

स्मारकाच्या दुरुस्तीसाठी आजच प्रशासनाला निर्देश द्या. पालिकेचे बजेट नसेल तर विरोधी पक्षातील नगरसेवक २५ लाखांचा निधी परत देतो, असा इशारा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला. अशरफ आझमी यांनी उल्लेख केला म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळी बाॅम्बे वेगळी करण्याचा घाट घातला होता. त्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले होते, की काँग्रेसच्या बाजूने जाऊ नका; पण आज शिवसेना ठाकरे पक्ष काँग्रेसबरोबर आहे, असा टोला शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमय घोले यांनी विरोधकांना लगावला. हुतात्मा स्मारकाच्या मुद्द्यात निधीचा विषय कुठून आला? कोणी किती निधी घेतला, सगळी डिटेल्स आहे, असा इशारा सभागृह नेते गणेश खणकर यांनी या वेळी विरोधकांना दिला.
---
अखेर प्रस्ताव मंजूर!
हुतात्मा चौकाचे सुशोभीकरण अहवाल १५ दिवसांत सादर करावा. स्मारकाच्या दुरुस्ती सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिका सक्षम आहे, निधी देण्याची गरज नाही, असा पलटवार महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर केला. तसेच मतदानाची प्रक्रिया पार पडली असून सत्ताधारी पक्षाला ११२ तर विरोधी पक्षाला ७९ मते मिळाल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे रितू तावडे यांनी जाहीर केले.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT