ठाणे-मुलुंडदरम्यानच्या नव्या रेल्वे स्थानकाला
आनंद दिघे यांचे नाव देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे आणि मुलुंडदरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या उपनगरी रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे, अशी भावना ठाणेकर नागरिकांमध्ये असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी सांगितले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.
केंद्र सरकारने नुकतीच या नव्या रेल्वे स्थानकाला तत्त्वतः मंजुरी दिल्याने प्रकल्पाला गती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून ठाणेकर नागरिक स्वतंत्र रेल्वे स्थानकाची मागणी करत होते. वाढती लोकसंख्या, रेल्वेवरील प्रवाशांचा ताण आणि परिसरातील वेगवान विकास लक्षात घेता हे स्थानक आवश्यक असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, प्राथमिक कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. सध्या केबलिंग आणि पुलाच्या बांधकामाचे काम सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. यासंदर्भातील प्रस्तावाला ठाणे महापालिकेने मंजुरी दिली असून, ठाण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात मोठे योगदान असलेल्या आनंद दिघे यांचे नाव नव्या स्थानकाला द्यावे, अशी मागणी संसदेतही करण्यात आल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.