खारघरमध्ये मित्राकडूनच ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांची लूट
खारघर, ता. ९ (बातमीदार) : खारघरमध्ये मित्रानेच विश्वासघात करत मित्राच्या मालकीचे ५७ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. परिमंडळ ३ चे पोलिस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
खारघर सेक्टर १२ येथे राहणारे सुशांत नामदेव मोरे (वय ३७) हे २२ एप्रिल रोजी मित्रांसोबत बेलापूर येथे जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर ते घरी परतत असताना घराजवळ कार पार्क करून पायी जात होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी मारहाण करत मोरे यांच्या हातावर चाकूने वार केले आणि त्यांच्यासोबत असलेल्या महेश हाटे यांच्या ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हिसकावून फरार झाले. तपासादरम्यान फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी, मेव्हणा आणि साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हर्षद सागरे, राहुल उर्फ अमित माळी, अभिनंदन माळी, कोमल माळी, वैभव माळी, शुभम पाटोळे आणि संदीप गुजंळे यांना अटक केली आहे. यातील पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, दोघे पोलिस कोठडीत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक डमाळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.