मुंबई

बाजार समितीमधील केमिकल भेसळीवर सरकारचा दणका

CD

केमिकल भेसळीवर सरकारचा दणका
बाजार समितींमधील दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने कडक इशारा जारी केला आहे. फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा कृत्रिमरीत्या पिकवणे, रंग-चमक वाढवणे किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा यामध्ये केमिकल स्प्रे आणि भेसळीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. काही व्यापारी आणि संबंधित यंत्रणांतील घटकांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याच्या चर्चाही बाजार वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर पणन संचालक शरद जारे यांनी राज्यभरासाठी कठोर आदेश जारी केले आहेत.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार
परिपत्रकानुसार, बाजार आवारात विक्री होणाऱ्या शेतमालात भेसळ करणे, रंग वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करणे किंवा टिकवण्यासाठी घातक केमिकल वापरणे आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यासह बाजारातील सुविधा काढून घेण्याचाही इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व बाजार समित्या आणि परवाना धारकांना नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, संशयित शेतमालाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT