उलवेतील ‘हाय-टेक कॅसल’ इमारतीला भीषण आग
उलवे, ता. ९ (बातमीदार) : उलवे सेक्टर १७ परिसरातील ‘हाय-टेक कॅसल’ इमारतीला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.