मुंबई

रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

CD

रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा

पाली-सुधागड आणि महाडमध्ये घरांचे, विजेच्या यंत्रणेचे मोठे नुकसान

महाड/पाली, ता. ९ (वार्ताहर) : पाली शहरासह सुधागड तालुका आणि महाड परिसराला शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, विद्युत तारा तुटल्या तसेच घरांचे आणि इमारतींचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले असून, वीजपुरवठाही खंडित झाला.

पालीमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पाली बस स्थानक ते तहसील कार्यालय मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे पत्रे उडाले, तर भेरव आणि टेंभी वसाहत परिसरातील घरांचेही नुकसान झाले. पाली-खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ विजेचा खांब वाकल्याने तारा रस्त्यावर लोंबकळत होत्या. खुरावले फाट्याजवळ मोठे होर्डिंग कोसळले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. बल्लाळेश्वर नगर आणि झाप गाव परिसरातही झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

झाडे आणि विजेचे खांब कोसळले
महाड शहर आणि ग्रामीण भागालाही वादळी पावसाचा मोठा फटका बसला. आयटीआय परिसरात झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. नवे नगर भागात इमारतींचे पत्रे उडून रस्त्यांवरील केबलमध्ये अडकले. ग्रामीण भागातील चांभारखिंड, चांढवे खुर्द आणि कांबळे तर्फे महाड परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले असून, घरांतील सामानही पावसामुळे भिजले. आंब्याचा हंगाम सुरू असताना जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबे गळून पडल्याने बागायतदारांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT