मुंबई

छायाचित्र हा जिवंत इतिहास

CD

छायाचित्र हा जिवंत इतिहास!
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः फोटोग्राफर जेव्हा एखादा क्षण टिपतो तेव्हा तो केवळ फोटो नसून भविष्यासाठी जतन केलेला एक जिवंत इतिहास असतो, रजनीश काकडे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून मुंबईचा असाच अनमोल इतिहास टिपला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मुंबई प्रेस क्लबने असोसिएटेड प्रेसच्या वतीने रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. त्याचे उद्‍घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ८) करण्यात आले. रजनीश काकडे यांनी मुंबईतील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे टिपलेले निवडक क्षण या प्रदर्शनात मांडले आहेत. काकडे आपल्यात नाहीत; पण आजही त्यांची छायाचित्रे आपल्याशी बोलताहेत असे वाटते, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. छायाचित्रकारांनी मिळून एक कायमस्वरूपी दालन उभे केल्यास मुंबईचा, देशाचा इतिहास जगाला फोटोच्या माध्यमातून दाखवू शकतो, असे प्रतिपादन करताना रजनीश काकडे यांच्यासारख्या छायाचित्रकाराला मर्यादित ठेवू नये, त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शने देशात ठिकठिकाणी आयोजित करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. फोटोग्राफरने स्वतःचे फोटो डेव्हलप करण्याबरोबर आपल्यासारखेच आणखीन फोटोग्राफर डेव्हलप करायला हवेत, आपल्याकडील कला इतरांनाही शिकवायला हवी आणि तो एक मोठा गुण रजनीश यांच्याकडे होता, असेही ते म्हणाले. या वेळी खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि प्रवक्ते हर्षल प्रधान उपस्थित होते. हे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT