मुंबई

अंबरनाथचा पारा ४३ अंशांवर

CD

अंबरनाथचा पारा
४३ अंशांवर

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : महामुंबईत तापमानाने पुन्हा चाळिशी पार केली असून शनिवारी (ता. ९) ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये यंदा मे महिन्यातील सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली आहे. तापमानाची सरासरीपेक्षा जास्त तीव्रता असल्याने उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. कल्याण, बदलापूरमध्येही अनुक्रमे ४३.१ अंश आणि ४३ अंशांची नाेंद झाली. दरम्यान, मुंबईत राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या नोंदीनुसार मे महिन्यात ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यानंतर बदलापूरमध्ये हवामानात अचानक बदल हाेऊन दुपारी ४च्या सुमारास काळे ढग दाटून धुळीच्या वादळासह जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर शहरात जोरदार सरीही कोसळल्या. त्यामुळे शहराचे तापमान ४३ अंशांवरून ३१ अंशांपर्यंत घसरले. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
----
ठाणे जिल्ह्यातील तापमान (अंश सेल्सिअस)
अंबरनाथ : ४३.४
कल्याण : ४३.१
बदलापूर : ४३
डोंबिवली : ४२.८
मुंब्रा : ४२.५
ठाणे ः ४०.२
नवी मुंबई ः ४०.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT