मुंबई

बदलापूरचा पारा ४३ अंशांवर

CD

बदलापूरचा पारा ४३ अंशांवर
शनिवारी सर्वाधिक तापमानाची नोंद; संध्याकाळच्या पावसाने दिलासा
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : शहरात शनिवारी हवामानाने अक्षरशः वेगळेच रूप दाखवत नागरिकांना तीव्र उष्णतेपासून वादळी पावसापर्यंतचा अनोखा अनुभव दिला. दुपारच्या सुमारास शहरातील तापमान तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हवामान अभ्यासकांच्या नोंदीनुसार मे महिन्यातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. सरासरीपेक्षा सुमारे सहा अंशांनी अधिक तापमान नोंदवल्याने शहरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती.

सकाळपासूनच कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी उष्णतेचा तीव्र परिणाम स्पष्टपणे जाणवत होता. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे बदलापूरकर हैराण झाले होते; मात्र सायंकाळच्या सुमारास हवामानाने अचानक नाट्यमय बदल घेतला. कोरडे उत्तरेकडील वारे आणि दमट पश्चिमी वाऱ्यांच्या संगमामुळे वातावरणात संवहनी प्रक्रिया वेगाने सक्रिय झाली. दुपारी ४च्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि धुळीच्या वादळासह जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर शहरात वादळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या अचानक झालेल्या बदलामुळे काही वेळातच तापमान थेट ४३ अंशांवरून ३१ अंशांपर्यंत घसरले. दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT