मुंबई

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्र

CD

अकरावी प्रवेशातील अडचणींवर मात
पालघर जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन केंद्र सुरू

पालघर, ता. १० (बातमीदार) ः राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तांत्रिक सहाय्य मिळावे, यासाठी पालघर जिल्ह्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, नोंदणी करणे, पसंतीक्रम भरणे, कागदपत्रे अपलोड करणे तसेच तांत्रिक अडचणी सोडविण्याचे मार्गदर्शन केंद्रावर मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.
पालघर जिल्ह्यासाठी यशवंत चाफेकर ज्युनियर कॉलेज, टेंभोडे, पालघर येथे मार्गदर्शन केंद्र निश्चित करण्यात आले आहे. या केंद्रासाठी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) चतुर पाटील व माधव मते यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-------------------------
संपर्काचे आवाहन
राज्य शासनाच्या निर्देशानुसार अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा तांत्रिक समस्यांसाठी मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT