भिंतींवरील चित्रांतून रंगांची उधळण
डहाणूत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती
कासा, ता. १० (बातमीदार)ः डहाणू नगर परिषद हद्दीत स्वच्छ सर्वेक्षण अभियानअंतर्गत शहर अधिक स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत प्रमुख चौक, सार्वजनिक भिंती, शासकीय इमारती परिसरातील भिंतींवर विविध चित्रातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे.
डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, मुख्याधिकारी अक्षय गुडधे तसेच आरोग्य विभाग अधिकारी कृणाल आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. सौंदर्यीकरणासह सामाजिक संदेशातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
----------------------------------
शहर विकासाचे प्रयत्न
पारंपरिक सण-उत्सव, जलसंवर्धन, वायुप्रदूषण नियंत्रण, अग्निसुरक्षा, भूमी संवर्धन, प्लॅस्टिकमुक्त शहर, स्वच्छता, वृक्षसंवर्धन, कचरा वर्गीकरण, पर्यावरण संरक्षणासारख्या विविध विषयांचा समावेश आहे. यापूर्वीही डहाणू नगर परिषदेने डहाणू खाडीपुलापर्यंत विद्युत पोल उभारून आकर्षक दिवे बसवले होते. या संकल्पनेतून डहाणू नगर परिषद शहर विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-------------------------
सामाजिक संदेशांवर भर
प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक असल्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे. यासोबतच शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान, वृक्षारोपणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
----------------------------
माझे शहर-माझी जबाबदारी भावनेतून प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने उपक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे.
- अक्षय गुडध्ये, मुख्याधिकारी डहाणू नगर परिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.