मुंबई

पक्षांना खाद्य घातल्यास शिक्षा

CD

‘भूतदया’ पालिकेच्या रडारवर
पक्ष्यांना खाद्य देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
विरार, ता. १० (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेने सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वसई, विरार शहरातील रस्ते, बस थांबे, बस आगार, मोकळी मैदाने, धार्मिक स्थळे तसेच तलावांशेजारील मोकळ्या जागेत पक्ष्यांना खाद्य दिले जाते. अनेकदा खाद्य कुजल्याने तसेच पक्ष्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरते. तसेच परिसर अस्वच्छत होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास प्रतिबंधाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
================================
आजारांचा धोका
वसई-विरार शहरात टेरेस, इमारतीचे आवार, चौकात कबुतरांना दाणे टाकले जात असल्यामुळे संख्येत मोठी वाढ झाली आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक जिवाणू तसेच बुरशीजन्य आजार पसरतात. दादर येथील कबुतरखाना परिसरात खाद्य देण्यावरून याच कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे वसई-विरार पालिकेने खबरदारीची पावले उचलली असून, पक्ष्यांना खाद्य देणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाणार आहे.
======================================
५०० रुपयांचा दंड
- महापालिकेच्या नव्या धोरणाबाबत माहिती देणारा सूचनात्मक फलक वसई रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आला आहे, पण पालिकेने व्यापक स्वरूपात याबाबत जनजागृती करण्याची गरज नागरिक व्यक्त आहेत.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये दंड भरावा लागणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs LSG Live : उर्विल पटेलने झळकावले आयपीएलमधील वेगवान अर्धशतक; हात जोडले अन् खिशातून कागद काढला.. काय लिहिलं होतं?

Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

Latest Marathi News Live Update: डोंबिवलीनजीक रुणवाल गार्डनमध्ये पाणीटंचाई, नागरिकांचा बिल्डर कार्यालयावर मोर्चा

PCOS & IVF Failure Causes: PCOS, अनियमित पाळी आणि IVF Failure मागे स्ट्रेस कारणीभूत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT