मुंबई

२२ गावे, शंभर पाड्यांवर गैरसोय

CD

२२ गावे, शंभर पाड्यांची गैरसोय
ढेकाळे उपकेंद्राच्या जमिनीवरून पेच
पालघर, ता. १० ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे उपकेंद्रासाठी मंजूर जमिनीची मागणी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेसाठी केली आहे. यामुळे २२ गावे, १०० पाड्यांची गैरसोय होणार आहे.
पाटबंधारे विभागाकडून महावितरणला एक रुपया नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. धोरणात्मक निर्णय असल्यामुळे पाटबंधारे विभाग आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सरकारकडे बोट दाखवल्याने भूखंडाचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. वर्षभरापासून प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने पावसाळ्यात हजारो वीजग्राहकांना विजेअभावी गैरसोय सहन करावी लागणार आहे. सावरखंड उपकेंद्रअंतर्गत ढेकाळे फिडरवरील १० ते १२ हजार व्यावसायिक तसेच घरगुती वीजग्राहक गेल्या काही वर्षांपासून विजेच्या समस्यांमुळे हैराण झाले आहेत. पाटबंधारे विभागाकडून उपकेंद्र उभारणीसाठी जागेसाठी सोळा लाख वार्षिक भाड्याची रक्कम अवाजवी असल्यामुळे उपकेंद्र निर्मितीचे भविष्य अंधारात आहे.
-----------------------------
१६ लाखांचे वार्षिक भाडे
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या २४, २६ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या एक एकर जागा महावितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर केला होता. या जागेच्या भुईभाड्यापोटी १४ लाख चार हजार ५४ रुपये तसेच १८ टक्के जीएसटीची रक्कम दोन लाख ५२ हजार ७३० मिळून वार्षिक भाड्याची रक्कम १६ लाख ५६ हजार ७८४ इतकी आकारण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT