मुंबई

अंबरनाथमध्ये पाणीबाणी; सोमवारी पाणीपुरवठा बंद

CD

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन विभागामार्फत मुख्य जलवाहिनीवर तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने अंबरनाथ, बदलापूर (पश्चिम) आणि ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) तब्बल १२ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार, सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. मात्र, चिखलोली व एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय दुरुस्तीच्या कामानंतर पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. अचानक जाहीर झालेल्या या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हाच्या तीव्रतेत पाण्याच्या टंचाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

Sindhudurg Mystery: कणकवलीत रहस्यमय घटना! ना भूकंप, ना स्फोट; फोंडाघाट परिसरातील अचानक घरांच्या भिंतींना तडे, घटनेचे गूढ

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT