पालघर, ता. १० : पालघर मंडळ कार्यालयामध्ये महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महसूल समाधान शिबिरामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला असून, अशा उपक्रमांची भविष्यातही आवश्यकता असल्याची भावना गावित यांनी व्यक्त केली.
शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रश्नांचे निराकरण, कागदपत्रांची पडताळणी, सातबारा उतारे, फेरफार नोंदी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान तहसीलदार रमेश शेंडगे, नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्यासह नगरसेवक, मंडळाधिकारी राजू पाटील, तलाठी, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
माजी आणि विद्यमान नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे आणि उत्तम घरत यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, नगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या नावावर असलेल्या जमिनी नगरपालिका प्रशासनाच्या नावे हस्तांतरित करून संबंधित सातबारा उतारे प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेमुळे भविष्यातील विकासकामांना गती मिळणार असून, प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
पालघर : येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.