मुंबई

ठाण्यात तीन कोटींचा चरस जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : चरस आणि प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुजरात येथील फिरोज अब्दुल खान (वय ५२ ) या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कळवा-खारेगाव टोलनाका परिसरात शुक्रवारी (ता. ८) अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल तीन कोटी दोन लाखांचा साठा जप्त केला आहे.

फिरोज खान हा कळवा-खारेगाव टोलनाका परिसरात चरस आणि स्पास्मो-प्रॉक्सिवॉन आर प्लस कॅप्सूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचण्यात आला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खारेगाव टोलनाक्याकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गावर संशयिताला ताब्यात घेत, त्याच्याकडे चौकशी केल्यास तो गुजरात येथील भरुच जिल्ह्यामधील अंकलेश्वरमधील असल्याचे समोर आले. यावेळी त्याच्या झडतीत त्याच्याकडून तीन किलो २० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. तसेच १२ हजार ९८४ स्पास्मो-प्रॉक्सिवॉन आर प्लस कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत एक लाख ४८ हजार ५०४ रुपये आहे.

जम्मू-काश्मीरपर्यंत धागेदोरे
त्याला हा माल जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि बिहारमधील काही व्यक्तींनी पुरवल्याचे चौकशी समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्यासह जम्मू-काश्मीर गुलबानवी, जुबेर, आश्रब व दिल्लीमधील मोनू आणि बिहारचा गणेश या सहा जणांविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच संशयितांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT