सेतू सहकाराचा
ॲड. शरदचंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय
भाडेकरू ठेवणाऱ्यांकडून
ठेवी स्वीकारता येतील का?
प्रश्न - आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काही सभासदांनी त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत. संस्था अशा सभासदांकडून बिन भोगावटा शुल्काव्यतिरिक्त काही रक्कम ठेव या स्वरूपात स्वीकारू इच्छिते आहे. असे करणे उपविधीच्या आधारे शक्य आहे का?
सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सदनिका भाड्याने देण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून आहे. अनेक सभासद त्यांच्या रिक्त सदनिका भाड्याने देऊन समाजाची सोयच पाहत असतात. तसेच त्या सदनिकेपासून काही रक्कम त्यांच्या उपजीविकेसाठीसुद्धा तरतूद करतात. सबब सदनिका भाड्याने देण्याचा मुद्दा हा कायदेशीर आहे व त्याला शासनाने अनेक वेळा कायदेशीर पाठबळ देण्याचे काम केले आहे. सदनिका भाड्याने देताना त्यावर घेणारे शुल्कदेखील शासनाने परिपत्रक काढून, मर्यादित करून संस्था तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याचे काम केले आहे.
तुमच्या प्रश्नामध्ये संस्था सभासदांकडून सदनिका भाड्याने देण्याच्या कृतीला योग्य ठरवून अशा सभासदांकडून काही रक्कम ठेव या स्वरूपात मागणी करू इच्छिते आहे. अशासाठी आदर्श उपविधीमध्ये संस्थेने त्यांच्या निधीची उभारणी कशा पद्धतीने करावी यासंबंधी मार्गदर्शन आहे. संस्था या उपविधीच्या आधारे सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकते. अशा ठेवी स्वीकारण्यासाठी संस्थेने सर्वसाधारण सभेची परवानगी घेणे आवश्यक आहे. घेतलेल्या ठेवी, त्याचा विनियोग, यासंबंधी धोरणे ठरवणे आवश्यक आहे. सबब सभासदांकडून या मार्गाचा अवलंब करून ठेवी स्वीकारणे शक्य आहे.
(सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सहकार कायदा या संदर्भातील प्रश्नांसाठी कृपया खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा..........)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.