मुंबई

अग्निशमन दलातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे

CD

अग्निशमन दलातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे
मेअखेरपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन
मुलुंड, ता. १० (बातमीदार) : मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. ५) प्रमुख अग्निशमन अधिकारी आंबुलगेकर यांच्या दालनात भायखळा येथे पार पडली. या बैठकीत अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस किशोरी पेडणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत चालक, यंत्रचालक आणि प्रमुख अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे तातडीने पदोन्नतीद्वारे भरण्याची मागणी प्राधान्याने मांडण्यात आली. २००६ च्या बॅचच्या सेवा ज्येष्ठतेसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. संबंधित मंजुरीनंतर मे २०२६ अखेरपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच दुय्यम अधिकारी पदांवरील रिक्त जागांसाठीही लवकरच स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शहरात वाढत असलेल्या अग्निशमन केंद्रे आणि वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दुय्यम अधिकारी पदांची संख्या वाढविण्यासाठी नव्या आकृतीबंधाचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा, यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यावरही सहमती दर्शविण्यात आली.

पाच टक्‍के आरक्षण
अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलिस खात्याच्या धर्तीवर पाच टक्के आरक्षण देणे, जोखीम भत्ता वाढविणे, नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना तातडीने पीपीई किट उपलब्ध करून देणे तसेच हलक्या वजनाचे व दर्जेदार सुरक्षा बूट पुरविणे, अशा महत्त्वाच्या मागण्यांवरही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे संघटनेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT