मुंबई

पथदर्शक फलकांवर फुकट्या जाहिराती

CD

पथदर्शक फलकांवर फुकट्या जाहिराती
नागरिकांकडून कारवाईची मागणी
मालाड, ता. १० (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मार्वे रोड ते चारकोप-कांदिवली जोडणाऱ्या मार्गावरील पथदर्शक फलकांवर अनधिकृत जाहिराती चिटकवण्याचे प्रकार वाढले आहेत. सार्वजनिक फलक, विजेचे बॉक्स, बेस्ट थांबे, उद्याने आदी ठिकाणी जाहिराती लावून काही जण मोफत प्रचार करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकाराबाबत अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी पालिकेकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्याकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनधिकृत जाहिरातबाजांमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढत असून “स्वच्छ मुंबई” अभियानालाही तडा जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असल्याने अशा जाहिरातींवर तातडीने कारवाई करून त्या हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT