मुंबई

उल्हासनगरात विकासकामांना गती

CD

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : शहरातील विविध विकासकामांना आमदार कुमार आयलानी यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळत असून, शुक्रवारी पॅनल क्रमांक ३ आणि ११ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. ८) आमदार, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विकासकामांमध्ये पदपथ, गटार व्यवस्था, सिमेंट काँक्रीट पॅसेज, शेड, समाज मंदिर, सार्वजनिक शौचालय, परिसर सुशोभीकरण; तसेच सुरक्षा भिंतीच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पाच कोटी रुपयांच्या मूलभूत सुविधा निधीतून करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान महायुतीतील एकजूटही पाहायला मिळाली. भाजप आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, रवी जग्यासी, प्रविण कृष्णानी, नगरसेविका प्रिती माखीजा, नगरसेवक राजू जग्यासी, तसेच मनोहर खेमचंदानी, विनोद माखीजा, संजय घुगे, हरेश भाटिया, साबिर शेख, प्रमोद पांडे, मंडळ अध्यक्ष अरविंद मिश्रा उपस्थित होते.

विकसित शहराचा उद्देश
शहरातील विविध भागांमध्ये आगामी काळात आणखी विकासकामे सुरू करण्यात येणार आहे. त्यांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल. उल्हासनगरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराची ओळख समृद्ध व विकसित शहर म्हणून निर्माण करणे, हा आपल्या प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी नमूद केले. भाजप-शिवसेना सरकारच्या माध्यमातून सर्व नगरसेवक विकासाच्या भावनेतून कार्यरत असून, त्यातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT