मुंबई

अंधेरी-जोगेश्वरीतील अनेक शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

CD

अंधेरी-जोगेश्वरीतील अनेक शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के
जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अंधेरी पूर्व येथील श्री नागरदास डी. बी. भुता हायस्कूलमधील २२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेचा निकाल १०० टक्के लागला. तसेच महाकाली केव्हज रोड येथील कनोसा हायस्कूलमधील १६४ विद्यार्थीही शंभर टक्के उत्तीर्ण झाले. श्री सत्य साई माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
डिव्हाईन चाइल्ड हायस्कूलमधील २४५ विद्यार्थी, आय. ई. एस. माध्यमिक शाळा, मरोळ येथील ४४ विद्यार्थी तसेच गुरुनानक इंग्रजी हायस्कूलमधील ४५ विद्यार्थ्यांनीही यश मिळवले. अंधेरी परिसरातील श्री गौरीशंकर केडिया इंग्लिश स्कूलमधील ११७ विद्यार्थी तसेच चकाला येथील बॉम्बे केंब्रिज शाळेतील ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जोगेश्वरी पूर्व परिसरातही यशाची परंपरा कायम राहिली असून, बालविकास विद्यामंदिर माध्यमिक शाळेतील ९८, प्रेमनगर येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील ७५ तसेच इन्फंट जेझस हायस्कूलमधील १२६ विद्यार्थी यशस्वी झाले.
निकाल जाहीर होताच शाळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT