मुरबाड, ता. १० (वार्ताहर) : स्वर्गीय लक्ष्मण शंकर घुडे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची नात आणि विनायक घुडे, एलआयसी विकास अधिकारी आणि विनिता घुडे यांची कन्या जुईली घुडे हिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. जुईली घुडे कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल बदलापूर येथे दहावीच्या इयत्तेत शिकत होती. शाळेमधील शिक्षकवर्ग, पिसिसी क्लासमधील शिक्षकवर्ग, मराठीचे शिक्षक भाऊ हरड, गणित विषयचे इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासात सातत्य आणि मेहनत घेतली तर निश्चितच यश मिळते, हे जुईली हिने दाखवून दिले आहे. पुढे ११ वी, १२ वी सायन्स करून मेडिकलला जाण्याची इच्छा जुईलीने व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, आजीबाईंच्या आणि साने गुरुजी विद्यालयचे संस्थापक अध्यक्ष दिलीप दलाल, कुणबी समाज सेवा संघ बदलापूरचे अध्यक्ष, अरुण मुंढे, माजी अध्यक्ष सदानंद सुरोशे व सर्व कार्यकारिणी, बदलापूरमधील स्थानिक नगरसेविका हर्षदा पवार, हर्षाली गायकवाड, समाजसेवक उमेश पवार, लोक हिंद चॅनेलचे संपादक आणि माजी उपसभापती महेश धानके, नातेवाईक यांनी जुईली घुडे हिचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.