एचव्हीपीएस लॉ कॉलेजमध्ये पदवीधरांचा गौरव सोहळा
विधी क्षेत्रात योगदान देण्याचे मान्यवरांचे आवाहन
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : एचव्हीपीएस कॉलेज ऑफ लॉ येथे ९ मे २०२६ रोजी भव्य दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. एलएलबी व बीएलएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा अभिमानास्पद आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अधिवक्ता के. के. रमानी, विशेष अतिथी म्हणून अधिवक्ता कोंडे देशमुख विठ्ठल भाऊराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह तसेच प्रभारी प्राचार्या डॉ. श्रीमती मधुरा कलमकर उपस्थित होत्या.
या वेळी मार्गदर्शन करताना अधिवक्ता रमानी यांनी बदलत्या न्यायव्यवस्थेतील आव्हाने, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासू वृत्ती ठेवून समाजहितासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवक्ता कोंडे देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना व्यावसायिक प्रामाणिकपणा, न्यायप्रियता आणि नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले. कायद्याच्या क्षेत्रात कार्य करताना समर्पण, निष्पक्षता आणि सचोटी या मूल्यांचे पालन करण्याचा संदेश त्यांनी दिला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाज व राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रभारी प्राचार्या डॉ. मधुरा कलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शिस्त, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर व्यावसायिक जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले.
या दीक्षान्त समारंभाला प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा सर्वांनी उत्साहात आनंद साजरा करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.