मुंबई

समाधान शिबिरात दाखल्यांचे वितरण

CD

समाधान शिबिरात दाखल्यांचे वितरण

मुरूड (बातमीदार) : प्रशासनाने थेट जनतेच्या दारी जाऊन शासकीय सेवा पोहोचवणे हे शिवरायांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या संकल्पनेला साकार करण्याचे काम आहे. नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांनी केले. मुरूड-जंजिरा नगर परिषद कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसीलदार आदेश डफळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये उत्पन्नाचे ४८ दाखले, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १८ मंजुरी प्रमाणपत्रे, ७/१२ चे २१७ दाखले, ८-अ चे १७२ दाखले, ७ शिधापत्रिका तसेच ५ आधार कार्डाचे वितरण करण्यात आले. तसेच निवडणूक विभागाचे विविध अर्ज, उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नगर परिषद असेसमेंट, संजय गांधी निराधार योजनेची नवीन प्रकरणे आणि शिधापत्रिकेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT