मुंबई

बंद घरांवर चोरट्यांची नजर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : शाळांना सुट्ट्या लागल्या, चला गावी जाऊया किंवा फॅमिली ट्रिपला निघूया असा बेत आखणाऱ्या ठाणेकरांसाठी महत्त्वाचा इशारा आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात अनेक कुटुंबे काही दिवसांसाठी घर बंद करून बाहेरगावी जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करत असल्याचे वाढत्या घरफोडीच्या घटनांमधून स्पष्ट होत आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२५ या वर्षातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल १४९ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, यापैकी केवळ २७ गुन्हे उघडकीस आल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये घर बंद करून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरटे प्रथम बंद घरे हेरतात. परिसरातील हालचालींचा अभ्यास करून योग्य संधी साधत ते कुलूप तोडून घरात प्रवेश करतात. विशेषतः दागिने, रोख रक्कम, महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर मौल्यवान वस्तूंवर त्यांची नजर असते. काही प्रकरणांमध्ये समाज माध्यमांवर शेअर करण्यात येणारे ‘आउट ऑफ स्टेशन’ फोटो, प्रवासाची माहिती किंवा लोकेशन अपडेट्सही चोरट्यांसाठी माहितीचे साधन ठरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान सुट्टीसंबंधी माहिती सार्वजनिकपणे पोस्ट करू नये, असा सल्लाही पोलिसांकडून देण्यात आला आहे. घर काही दिवस बंद ठेवणार असल्यास शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही किंवा सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि पोलिसांच्या ‘बीट मार्शल’ किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क ठेवणे, अशा उपाययोजना करण्याचे आवाहनही पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

घर बंद करण्यापूर्वी विश्वासू शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही सुरू ठेवणे, सोसायटी सुरक्षा रक्षकांना कळवणे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. थोडीशी खबरदारी घेतल्यास सुट्टी आनंदाची ठरू शकते.
- अमरसिंह जाधव, उपायुक्त, गुन्हे शाखा,ठाणे

घ्यावयाची काळजी
* घर लॉक करण्यापूर्वी सर्व दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करा.
* शेजाऱ्यांना किंवा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना बाहेरगावी जात असल्याची माहिती द्या.
* घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम किंवा दागिने ठेवणे टाळा.
* सीसीटीव्ही किंवा सुरक्षा अलार्म प्रणालीचा वापर करा.
* समाज माध्यमांवर प्रवासाची माहिती किंवा लोकेशन सार्वजनिकपणे शेअर करू नका.

आकडेवारीचा तक्ता
२०२५मार्चअखेर २०२६मार्चअखेर
परिमंडळ गुन्हे/ उघड गुन्हे / उघड
ठाणे-१ ४०/२७ ३५/१८
भिवंडी-२ ३८/२४ २९/१३
कल्याण-३ ४५/२४ ३८/१८
उल्हासनगर-४ ३६/१६ ३७/२०
वागळे इस्टेट-५ १६/९ ६/२
एकूण १७५/३९३ १४५/०७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT