मुंबई

मुलुंडमधील शाळांचा १०० टक्‍के निकाल

CD

मुलुंडमधील शाळांचा १०० टक्‍के निकाल
मुलुंड, ता. १० (बातमीदार) ः दहावीच्या निकालात मुलुंड, भांडुप आणि कांजूर परिसरातील विविध शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भांडुप पश्चिम येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजारामशेठ विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, तन्वी भिंगे हिने ८३.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९४ टक्के लागला असून, संजीव पंडित याने ९१.६० टक्के गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
मुलुंड येथील सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ईशा सोनावणे हिने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर आयुष मेहता याने ९९.२० टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.
कांजूर येथील सरस्वती विद्यालयानेही यंदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विद्यार्थिनी संस्कृती सचिन वीर हिने ९६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT