स्मारकाच्या सुशोभीकरणास मंजुरी
वाशी (बातमीदार) : ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणासह गळती दुरुस्ती व अनुषंगिक स्थापत्य विषयक कामांना नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुक्रवार (ता. ८)च्या बैठकीत हा महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे लवकरच या स्मारकाचा कायापालट होणार असून, परिसर अधिक आकर्षक आणि सुविधायुक्त होणार आहे. ऐरोली विभागातील हे स्मारक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र मानले जाते. येथे विविध सामाजिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी तसेच सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात गळती होणे, प्लास्टर खराब होणे तसेच काही ठिकाणी संरचनात्मक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे स्मारकाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. तज्ज्ञांच्या पाहणीनंतर स्मारकाच्या संरचनात्मक दुरुस्तीबरोबरच आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत स्मारकाचे सुशोभीकरण, प्रवेशद्वार उभारणी, रंगकाम, विविध दुरुस्ती कामे तसेच गळती थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्मारक अधिक सुरक्षित, आकर्षक व उपयुक्त होणार आहे. या कामासाठी पालिकेकडून सुमारे दोन कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.