मुंबई

सानपाडा विभागाला अस्वच्छतेचा विळखा!

CD

सानपाडा विभागाला अस्वच्छतेचा विळखा
समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

नेरूळ, ता. १० (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानात मनपाचे नाव देशस्तरावर गाजत असताना, त्यांच्याच कार्यक्षेत्रातील सानपाडा परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहेत. त्यामुळे सानपाडा विभागाला अस्वच्छतेचा विळखा पडल्याची भावना नागरिक व्यक्त करीत असून, आता स्थानिक नागरिकच स्वतः कृती करून कचरा होऊ न देण्याच्या मानसिकतेत आहेत. एवढेच नव्हे, तर काहींनी रात्रीच्या वेळेस बाहेरून कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना विरोध करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सानपाडा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताच सानपाडा येथे जाताना कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. तसेच येथील पार्किंग परिसरात अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला उघड्यावर टाकलेला कचरा शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करीत आहे. ही परिस्थिती फक्त त्रासदायक नाही, तर सानपाड्याच्या प्रतिमेलाही धक्का देणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विवेकानंद संकुल परिसरातील मैदान, जिथे मुलांनी खेळायला हवे तिथे आज कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असल्याचे नागरिक सांगत आहेत.

------------
नागरिकांनी जबाबदारी ओळखावी!

अशा परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारी टाळता येणार नाही. निवडणुकीच्या वेळी स्वच्छतेची आश्वासने देणारे आज या प्रश्नांकडे डोळेझाक करीत असतील, तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट असल्याचे मत नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच यात केवळ पालिकेला दोष देऊन चालणार नाही, तर नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. त्यामुळे घंटागाडी असताना, कचरा रस्त्यावर टाकणे, उघड्यावर घाण करणे, या सवयी स्वतः बदलल्या पाहिजेत. स्वच्छता ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून सुरू करायची सवय लावली पाहिजे, असे येथील नागरिक सांगत आहेत.
----------

स्वच्छ, सुंदर आणि नियोजित सानपाडा हा आमचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. ज्यांना जबाबदारीची जाणीव आहे त्यांनी पुढे यावे, अन्यथा आता नागरिकच त्यांना कृतीतून उत्तर देतील, असे निवेदनही पालिकेला दिले आहे.
- नीलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT