मुंबई

दहावीत बदलापूरचा मराठी ‘पॅटर्न’ सुपरहिट

CD

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : बदलापूर शहरातील मराठी माध्यमाच्या शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत दणदणीत यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. शहरातील अनेक नामांकित शाळांचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून, गुणवत्तेच्या शर्यतीत मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय, बदलापूर हायस्कूल बदलापूर गाव तसेच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या काही शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. आदर्श विद्यामंदिर मराठी माध्यम शाळेचा निकाल ९८.३६ टक्के इतका लागला असून, श्रीकृष्ण खामकर विद्यालयाचा निकाल ९८ टक्के इतका लागला आहे.

द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाने यंदा १०० टक्के निकालाची कामगिरी करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली. तन्मयी महेंद्र तोडसकर हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर रुद्रांश शिंदे याने ९१.२० टक्के गुणांसह द्वितीय, करिष्मा सावळे हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या शाळेत विशेष गुणवत्तेत ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले आहेत.

बदलापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचाही निकाल नेहमीप्रमाणे १०० टक्के लागला असून, प्राची बोराडे हिने ९२.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ गायकवाड याला ८८.६० टक्के तर वैभवी कांबळे हिला ८७.२० टक्के गुण मिळाले. या शाळेत २१ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी मिळवली आहे.

बदलापूरमधील नामांकित आदर्श विद्यामंदिर मराठी माध्यम शाळेचा निकाल ९८.३६ टक्के लागला. ३६७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जान्हवी परब हिने ९७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला, तर निनाद मुळे याला ९४.२० टक्के आणि श्लोक देशपांडे याला ९३.६० टक्के गुण मिळाले. बदलापूर पश्चिमेकडील श्रीकृष्ण खामकर विद्यालयाचाही निकाल ९८ टक्के लागला असून, शिवानी भोसले हिने ८८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिकी माळुंजे हिला ८५.४० टक्के तर संचिता फोकणे हिला ८४.६० टक्के गुण मिळाले.

पालिका शाळांनी सिद्ध केली ताकद
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या शाळांनी यंदा उल्लेखनीय यश मिळवत पालिका शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावला आहे. पीएम श्री डिजिटल शाळा क्रमांक १ कुळगाव, उर्दू शाळा क्रमांक २ आणि एरंजाड माध्यमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला. पीएम श्री डिजिटल शाळेत आशिष मोरे (८७ टक्के), उजमा शेख (८५ टक्के) आणि धनश्री राठोड (८४ टक्के) यांनी गुणवत्ता सिद्ध केली. उर्दू शाळेत जुबिया शेख हिने ८१.४० टक्के गुण मिळवले, तर एरंजाड शाळेत भाविका मेहेर हिने ८१.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT