ठाणे, ता. १० : हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात कळवा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल १८ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ११० मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२५ आणि २०२६ या कालावधीत मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल गायकवाड आणि पोलिस निरीक्षक (प्रशासन) विठ्ठल नावडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईलची माहिती सीईआयआर पोर्टलवर अपलोड करून वापरणाऱ्यांचे पत्ते शोधले. एकूण ११० मोबाईल ताब्यात घेत मूळ मालकांना परत दिले. ही कारवाई पोलिस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.