मुंबई

कचरावेचक महिलांनी ओलांडला ‘दहावी’चा उंबरठा

CD

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : ज्या हातांनी आयुष्यभर कचरा वेचला, त्याच हातांनी जिद्दीने लेखणी धरली आणि संसाराच्या रहाटगाडग्यात सुटलेले शिक्षणाचे स्वप्न सत्यात उतरवले. नवी मुंबईतील ११ कचरावेचक महिलांनी सर्व अडचणींवर मात करत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘कचरावेचक ते विद्येच्या प्रांगणात’ असा हा त्यांचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

लग्न, आर्थिक कारणांमुळे सातवी-आठवीतच शाळा सुटलेल्या या महिलांना शिक्षणाकडे वळवणे सोपे नव्हते. कोणाचा शिक्षणात १५ वर्षांचा गॅप होता, तर कोणी ३५ वर्षांनंतर पुन्हा पुस्तक हातात धरले होते. शाळा सोडल्याचा दाखला नसणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे अशा तांत्रिक अडचणींसोबतच कौटुंबिक विरोधाचा सामनाही या महिलांना करावा लागला. अनेक महिलांना पतीच्या रोषाला आणि घरगुती भांडणांना सामोरे जावे लागले, तरीही ‘पास व्हायचेच’ या जिद्दीने त्या डगमगल्या नाहीत.

अखेर ११ कचरावेचक महिलांनी सर्व अडचणींवर मात करत दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र चित्र पालटले. ज्या पतींनी विरोधात भूमिका घेतली होती, त्यांनीच चाळीत पेढे वाटून, केक कापून आणि चॉकलेट देऊन आपल्या पत्नीच्या यशाचे स्वागत केले. या सर्व महिलांनी आता पदवीपर्यंत शिकण्याचा मानस व्यक्त केला आहे.

‘आता थांबायचं नाही’ने दिली प्रेरणा
गेल्या वर्षी १० मे रोजी ‘आता थांबायचं नाही’ हा चित्रपट पाहून २५ महिलांनी शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी ११ जणींनी प्रत्यक्ष परीक्षेचा अर्ज भरला. स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्टने या महिलांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांना मार्गदर्शन केले. शेवटच्या दोन महिन्यांत त्यांना पगारी रजा देऊन सराव करून घेण्यात आला. कोपरखैरणे येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात या महिलांना विषयांचे धडे दिले, तर आशा गायकवाड यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे या रणरागिणींनी सिद्ध केले आहे. घरचा विरोध, संसाराची जबाबदारी आणि अनेक वर्षांचा खंड असूनही केवळ ‘पास व्हायचेच’ या जिद्दीमुळेच त्यांनी आज हा यशाचा टप्पा गाठला आहे. त्यांचा हा प्रवास केवळ त्यांचाच नाही, तर वस्तीतील प्रत्येक स्त्रीसाठी आशेचा किरण आहे.
- प्रा. वृषाली मगदूम, विश्वस्त, स्त्री मुक्ती संघटना

महिलांनी जिद्दीच्या जोरावर यश मिळवले आहे. त्यांच्या या प्रेरणेतून आणखी अनेक महिला शिक्षणासाठी पुढे येतील आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू.
- डॉ. प्रशांत थोरात, प्रभात ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT