मुंबई

अभुदय नगर पुनर्विकासासाठी विकासकाला भरावी लागणार ४९ कोटीची बँक गॅरंटी

CD

अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी लागणार बँक गॅरंटी
विकसकाला म्हाडाकडून ४५ दिवसांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : म्हाडाने काळाचौकी अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी मे. एम.जी.एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा.लि., मे. एन.एन.पी. बिल्डकॉन प्रा. लि., मे. ओनेस्ट शेल्टर्स प्रा.लि. यांना संयुक्तपणे स्वीकृती पत्र दिले आहे. त्यानुसार संबंधित विकसकांनी आता एकत्रितपणे एका कंपनीची स्थापना करून त्या माध्यमातून ४९ कोटी रुपयांची म्हाडाला बँक गॅरंटी देणे बंधनकारक असणार आहे. तसेच या वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या ५१ टक्के रहिवाशांची पुनर्विकासासाठी सहमती घ्यावी लागणार आहे.
अभ्युदयनगरचा बांधकाम व विकास संस्थेच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार आहे. रहिवाशांना प्रत्येकी ६४१ चौरस फुटांची सदनिका पुनर्विकसित इमारतीत मिळणार आहे. दरम्यान, हा पुनर्विकास प्रकल्प विकसकाने पूर्ण न केल्यास त्याची जबाबदारी म्हणून बँक गॅरंटी जप्त करण्याचा अधिकार म्हाडाकडे आहे. त्याचाच भाग म्हणून पुढील ४५ दिवसांत संबंधित विकसकांनी एक कंपनी स्थापन करून म्हाडाला बँक गॅरंटी भरणे बंधनकारक असणार आहे.

प्रकल्पाचे भवितव्य ठरणार
विकसकाची आर्थिक क्षमता नसल्याचे गृहीत धरून म्हाडाकडून नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे विकसक वेळेत बँक गॅरंटी भरतात का, रहिवाशांची सहमती मिळते का, यावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे. तसेच त्यानंतर म्हाडा आणि विकसक संस्थेसोबत पुनर्विकासाबाबतचा मुख्य करारनामा होऊ शकणार आहे. सुमारे ३३ एकराच्या भूखंडावर असलेल्या या वसाहतीत सद्यस्थितीत ४८ इमारती असून २०८ चौरस फूट आकारमानाच्या ३,४१० सदनिका आहेत. त्यामध्ये ३,३३५ निवासी सदनिका तसेच ७५ अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

Pimpri News : पालखी सोहळा तोंडावर, उपाययोजना कागदावर! कुठे राडारोडा, कुठे अडथळे; महापालिकेने पाहणी करूनही परिस्थिती जैसे थे

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Highway Toll Rule India : वाहनचालकांसाठी खुशखबर ! महामार्गावर टोल नियमात मोठा बदल, खर्च होणार कमी; काय आहे सरकारचा प्लॅन?

कमळी शोधणार सरोजच्या मृत्यूचं सत्य ते जय वाचवणार शरूचा जीव; या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT