मुंबई

सामाजिक उपक्रमाचे वनमंत्र्यांकडून कौतुक

CD

सामाजिक उपक्रमाचे वनमंत्र्यांकडून कौतुक

वाशी (बातमीदार) : नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने साजरा करत सामाजिक कार्य करण्याचा निर्धार करणारे घणसोली येथील नगरसेवक गणेश सकपाळ यांचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विशेष कौतुक केले. शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर तसेच गोरगरीब नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. घणसोली गावातील जिजामाता नगर येथे पालिकेचे आरोग्य समिती उपसभापती व नगरसेवक गणेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नाईक ब्लड डोनर चेन व गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, नगरसेविका ललिता मढवी, अंजना म्हात्रे, माजी नगरसेवक घनश्याम मढवी, माजी परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे, दिलीप म्हात्रे, सदानंद पाटील, ए. के. पाटील, प्रमोद पाटील, सुनील रानकर, राम पाटील, गणेश सकपाळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र राजीवडे, भाऊसाहेब सावंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT