हुंडा न दिल्याने वसईत लग्नमंडपात हाणामारी
नवरी-नवरदेवाच्या दोन्ही कुटुंबीयांवर गुन्हे दाखल
नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : हुंडा म्हणून मागणी केलेले दोन लाख रुपये रोख रक्कम न दिल्याच्या रागातून, वसईतील एका लग्न समारंभातच नवरी- नवरदेवाच्या दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणात दोन्ही गटांच्या लोकांवर एकमेकांच्या तक्रारीवरून, वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र यात अल्पवयीन मुली, महिलांसोबतही अश्लील वर्तन झाल्याने नवरीकडून, नवरदेवाकडील मंडळींवर विविध गंभीर कलमांसह, हुंडा प्रतिबंध आणि पोक्सोन्वये गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिम भागात शुक्रवारी ही घटना घडली असून, शनिवारी (ता. ९) गुन्हा दाखल झाला आहे.
वसईत राहणारे मात्र मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुटुंबीयांचा ८ मे रोजी विवाह समारंभ पार पडला आहे. या लग्न समारंभात नवरीच्या आई-वडिलांनी नवरदेवासाठी हुंडा म्हणून जे दोन लाख रुपये देण्याचे ठरविले होते. ती रक्कम लग्नात दिली नाही. यावरून नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबीयांत सुरुवातीला चर्चा, नंतर वादावादी आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या हाणामारीत एकमेकांना खुर्ची फेकून गंभीर जखमी केले. तसेच महिला, अल्पवयीन मुली यांच्यासोबत अश्लील गैरवर्तन झाले. या प्रकरणात नवरीच्या कुटुंबीयाकडून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून नवरीच्या कुटुंबीयांवर विविध गंभीर कलमांसह गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.