मुंबई

टोल नाक्यांजवळ रात्री अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग

CD

टोलनाक्यावर बेकायदा पार्किंग
चारोटी टोलनाका परिसरात अवजड वाहनांमुळे कोंडी
कासा, ता. ११ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक, कंटेनर रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने इतर वाहनचालकांसाठी अडथळा ठरत आहेत. अनेकदा वाहनांच्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांना संथ गतीने प्रवास करावा लागत असून, रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी अवजड वाहने रस्त्याच्या अगदी कडेला उभी असल्याने इतर वाहनांना सुरक्षित मार्ग मिळत नाही. विशेष म्हणजे, टोलनाक्यांच्या परिसरात वाहनचालकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, हॉटेल, विश्रांतीची सुविधा उपलब्ध असताना नियमांकडे दुर्लक्ष करून महामार्गालगतच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
----------------------
कारवाईची मागणी
महामार्ग प्राधिकरण, पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतूक सुरळीत ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
----------------
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अनेक अवजड वाहनचालक रात्रीच्या वेळी रस्त्यालगत वाहने उभी करतात. त्यामुळे इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
- आशीष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते
-----------------------
चारोटी टोलनाका परिसरात नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात पोलिस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ४५ वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.
- अमर पाटील, पोलिस अधिकारी, कासा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT