थंडगार नारळपाण्याने उष्णतेवर मात
रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत
जव्हार, ता. ११ (बातमीदार)ः वातावरणातील उष्णता दिवसागणिक वाढत असल्याने तहान शमविण्यासाठी थंड पेयांचा आधार घेतात. मात्र, यामुळे आरोग्यविषयक तक्रारी उद्भवत असल्याने नारळपाणी उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी नारळपाणी सर्वांत चांगला पर्याय आहे. नारळपाणी एक उत्तम एनर्जी बूस्टर आहे. त्याचे नियमित प्राशन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय किडनीचे विकार दूर होण्याबरोबर त्वचाही चमकदार होत असल्याने आरोग्य तज्ज्ञांकडून नारळपाणी सेवनाचा सल्ला दिला जातो.
-----------------
तज्ज्ञांचा सल्ला
- नारळपाण्यात पोषक तत्त्वांचा नैसर्गिक स्रोत आहे. शरीराचे निर्जलीकरण होण्यापासून रोखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच रक्तदाब, शुगर नियंत्रणात राहते. किडनीचे आरोग्य चांगले राहते.
- केमिकलयुक्त पेय पिण्यापेक्षा ५० ते ७० रुपये प्रती नग नारळपाणी मिळतो. विशेष म्हणजेस आरोग्यासदेखील उत्तम आहे. शरीरासाठीच्या पोषक तत्त्वामुळे नारळपाणी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
------------------------------
नारळपाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी मोठ्या प्रमाणात नारळ खाऊ नये. तसेच पाणीदेखील अधिक प्रमाणात पिऊ नये. मात्र, ठरावीक प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.
- प्राची अंबोलकर, आहारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.