मुंबई

श्रीवर्धन पुणे प्रवासाला साडेआठ तास. वातानूकुलीत शिवशाही बस मधील प्रवासी घामाघुम

CD

श्रीवर्धन-पुणे प्रवासासाठी साडेआठ तास
वातानूकूलित शिवशाही बसमधील प्रवासी घामाघूम

श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) : श्रीवर्धन आगाराच्या शिवशाही बस बाबतीत मागील काही दिवसांपासून तक्रारी वाढत आहेत. श्रीवर्धन-पुणे प्रवासासाठी तब्बल साडेआठ तासांचा कालावधी लागला असून, वातानुकूलित बसमधील तांत्रिक बिघाड पाहता प्रवासी चक्क घामाघूम होत असल्याचे चित्र आहे.

श्रीवर्धन ते पुणे हा प्रवास निव्वळ साडेचार तास ते पाच तास असा आहे. मात्र, शिवशाही बसमधील तांत्रिक बिघाड पाहता हा प्रवास मंदावला आहे. रविवारी (ता. १०) श्रीवर्धन आगाराची दुपारी २ वाजता गोरेगाव मार्गे पुणे येथे पोहोचणाऱ्या शिवशाही बसचा त्रासदायक अनुभव प्रवासीवर्गाला आला. शिवशाही बस श्रीवर्धन आगारातून मार्गस्थ झाल्यानंतर तिचा धीम्या गतीचे प्रवास सुरू झाला. त्यामुळे प्रवासीवर्गात नाराजी होती. त्यातच वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत होत्या. काचावर लावण्यात आलेल्या पडद्यांना खूपच घाण वास येत होता. तसेच खुर्चांचे कापडी फाटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे सर्वच प्रवशांना याबाबत मनस्ताप सहन करावा लागला.
श्रीवर्धन स्थानकातून दुपारी २ वाजता पुणे येथे मार्गस्थ होणारी बस साधारणपणे सायंकाळी साडेसात वाजता स्वारगेटला दाखल होणे अपेक्षित होते, परंतु धीम्या गतीने जाणाऱ्या शिवशाहीने स्वारगेट आगार गाठण्यासाठी चक्क साडेदहा वाजवले.

-----------
परिवहनमंत्र्यांकडे साकडे

प्रवासीवर्गाने नियंत्रण कक्षाला फोन केला असता, ‘ज्या आगाराची बस आहे तिथे तक्रार दाखल करा. आम्हाला फोन करू नका’ असे उत्तर दिले. प्रवाशांनी स्थानकात फोन केल्यावर आम्ही याच बसने प्रवास करतो, या बसचा आम्हाला कधी त्रास जाणवला नाही. तुम्हाला कसा त्रास होत आहे, असे उत्तरही मिळाले. कालांतराने प्रवाशांचे फोनही उचलले गेले नाहीत, असे प्रवाशांचे म्हणणे असून, याप्रकरणी परिवहनमंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे साकडे प्रवाशांनी घातले आहे.

----------
या शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले होती. आम्ही कंट्रोल रूम व स्थानकात फोन केला. तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. नादुरुस्त व धीम्या बसचा आम्हाला त्रास झाला. या मार्गावर साधी बस सुरू करावी, अशी विनंती आहे.
- जगदीश पाडलेकर, प्रवासी, बागमांडला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT