मुंबई

एपीएमसी एक्सपोर्ट बिल्डिंगमध्ये अग्निसुरक्षा नियमांचा फज्जा

CD

एपीएमसी एक्सपोर्ट बिल्डिंगमध्ये अग्निसुरक्षा नियमांचा फज्जा
बेकायदा साठ्यामुळे भीषण दुर्घटनेचा धोका; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत व्यापाऱ्यांचा आरोप
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : एपीएमसी फळ मार्केट परिसरातील एक्सपोर्ट बिल्डिंगमध्ये अग्निसुरक्षा नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इमारतीमध्ये बेकायदेशीपणे कॅरेट, सुके गवत आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल आहे. यामुळे येथे कधीही भीषण आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फळ मार्केटमधील एक्सपोर्ट बिल्डिंगमधील अनेक गाळ्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कॅरेट आणि अन्य ज्वलनशील वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. त्यामुळे आग लागल्यास ती काही क्षणांत संपूर्ण इमारतीत पसरू शकते, अशी भीती व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक परिस्थितीबाबत संबंधित विभाग आणि एपीएमसी प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करून बेकायदेशीर साठा हटवावा, अडवून ठेवलेले जिने आणि आपत्कालीन मार्ग मोकळे करावेत. तसेच अग्निसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


जिने आणि आपत्कालीन मार्ग झाले कचराकुंडी
गंभीर बाब म्हणजे इमारतीतील जिने आणि आपत्कालीन मार्गांमध्येही विविध प्रकारचे सामान आणि कचरा टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याआधीही लागली होती आग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही या एक्सपोर्ट बिल्डिंगमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी एपीएमसीचे मुख्य सचिव शरद जरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एपीएमसीतील एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, यापूर्वी संबंधित गाळाधारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT