मुंबई

उद्यानांमध्ये हिरकणी कक्ष स्थापनेची गरज

CD

उद्यानांमध्ये हिरकणी कक्षाची मागणी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारणे अनिवार्य असतानाच, आता नवी मुंबईतील सार्वजनिक उद्यानांमध्येही अशा कक्षांची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील १८२ उद्यानांमध्ये दररोज हजारो महिला आपल्या लहान बाळांसह येत असतात, मात्र स्तनपानासाठी सुरक्षित जागा नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने उद्यानात विरंगुळा केंद्रांसोबत महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारावा, अशी मागणी शिवसेनेचे सीवूड येथील उपजिल्हाप्रमुख संतोष दवळी यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
मुंबई महापालिकेने नुकताच उद्यानामध्ये हिरकणी (स्तनपान) कक्ष उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्तनपानाच्या अडचणी लक्षात घेत त्यांची गैरसोय दूर करावी. नवी मुंबई शहर हे तलावांचे व उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात १८२ उद्याने असून, ज्वेल ऑफ नवी मुंबई, वंडर्स पार्क, सागर विहार, मिनी सी शोअर, निसर्ग उद्यान, धरणगिरी सेंट्रल पार्क अशी मोठमोठी उद्याने आहेत. ही उद्याने ही सुट्टीच्या दिवशी गजबजलेली असतात, परंतु इतर दिवशीही मोठी गर्दी असते. बऱ्याचदा त्यांच्यासोबत छोट्या मुलांसोबत लहान बाळेही असतात. अशावेळेस स्तनपान करताना महिलांची कुचंबणा होते. अशा वेळी हिरकणी कक्ष उद्यानात उपलब्ध झाल्यास मातांना सोयीचे होईल, असे संतोष दळवी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT