मुंबई

सिडको एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी सुधीर कोळी यांची निवड

CD

सिडको एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी सुधीर कोळी यांची निवड
तुर्भे (बातमीदार) : सुधीर कोळी यांची सिडको एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सुधीर कोळी यांनी यापूर्वीही सिडको आर्टिस्ट कम्बाईनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कर्मचारी एकोप्याचे उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या होत्या. नव्या जबाबदारीतून कर्मचारी हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटनेला अधिक बळकट करणे तसेच कर्मचारी कल्याणासाठी नवीन उपक्रम राबविण्यावर ते भर देतील, असा विश्वास सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

'प्रेम कायम...' विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत, कॅप्शनमध्ये लिहलं...'प्रेम श्रेष्ठ असतं'

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी

Nashik News : कुशावर्ताचे पाणी होणार स्वच्छ, निर्मळ अन्‌ निर्जंतुक; कुंभमेळा प्राधिकरणाचा विश्‍वराज फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

SCROLL FOR NEXT