मुंबई

खारघर तळोजा मध्ये पावसाळी पूर्व कामे जोरात सुरु

CD

खारघर तळोजामध्ये पावसाळापूर्व कामांना जोर
६०० कामगार तैनात; नालेसफाई, रस्ते दुरुस्तीवर भर
खारघर, ता. १२ (बातमीदार) : आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिकेने खारघर आणि तळोजा परिसरात पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे. यासाठी पालिका हद्दीत सुमारे ६०० कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत असून, नालेसफाई, गटारांची साफसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी निचरा व्यवस्था सुरळीत ठेवणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
महापालिका प्रशासनाकडून खारघर आणि तळोजा शहरातील नालेसफाई करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू असून, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निवासी भागासह मुख्य रस्ते, चौक आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले असून, नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा, असे सांगितले आहे.

पालिका हद्दीत पावसाळी कामे वेगात सुरू आहेत. पालिका क्षेत्रात सुमारे ६०० कामगार विविध विभागांमध्ये कार्यरत असून, पावसाळ्यापूर्वी हे काम व्हावे यासाठी युद्धपातळीवर कामे केली जात आहेत.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका

पालिका कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाची पालिका अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी होती. त्यात एप्रिल महिन्यात महापौर निवड, महासभा आदी शासकीय कामात वेळ गेल्यामुळे यावर्षी थोडीशी उशिरा पावसाळ्यापूर्वी साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, मेअखेरपर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT