मुंबई

नागरिकांनी कामासाठी नेमका संपर्क साधावा कुठे

CD

खारघरचे प्रभाग कार्यालय संपर्क क्षेत्राच्या बाहेर
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पायपीट
खारघर, ता. १२ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने खारघरमधील नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त प्रभाग कार्यालय उभारले आहे. मात्र, या कार्यालयात अधिकृत दूरध्वनी सेवाच अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, नागरी समस्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत संपर्क कसा साधायचा, असा सवाल खारघरवासीय विचारत आहेत.
खारघरमधील वाढती लोकसंख्या, नवीन सेक्टरचा विस्तार आणि नागरी समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालिकेने सुसज्ज प्रभाग कार्यालय उभारले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आणि विविध तक्रारींसाठी नागरिकांना या कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधावा लागतो. मात्र, या कार्यालयात दूरध्वनी सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत आहे. यामुळे नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कार्यालयीन वेळेनंतर आपत्कालीन घटना घडल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

मोबाईलवर प्रतिसाद नाही
पालिका प्रशासनाने खारघर प्रभाग कार्यालयात गेल्या वर्षभरात तीन प्रभाग अधिकारी दिले. मात्र, काही महिन्यांतच त्यांची बदली झाली. त्यातच प्रभाग कार्यालयात दूरध्वनी सेव अद्याप सुरू नाही, तर नव्या प्रभाग अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क केल्यास प्रतिसाद दिले जात नसल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

खारघरच्या ग्रामपंचायतकालीन प्रभाग कार्यालयातून नवीन प्रभाग कार्यालयात कामकाज हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे. नवीन प्रभाग कार्यालयात कामकाज सुरू करताना दूरध्वनी व इतर सुविधांविषयी माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
- कैलाश गावडे, उपायुक्त प्रशासन, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT