मुलुंडमध्ये तुटलेल्या मॅनहोलमुळे अपघाताचा धोका
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) : मुलुंड पूर्व येथील मणीज कॅफे परिसरात तुटलेल्या मॅनहोलच्या झाकणामुळे नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या रस्तेकामादरम्यान एका वाहनाचे चाक मॅनहोलवर गेल्याने झाकण तुटले. त्यानंतर संबंधित भाग खुला आणि धोकादायक अवस्थेतच राहिल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात हा तुटलेला भाग सहज लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या वाहनचालक अत्यंत सावधगिरीने मार्ग काढत असले तरी परिस्थिती कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन मॅनहोलचे झाकण दुरुस्त करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.