शिवडी, ता. ११ (बातमीदार) : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचा जोडीदार त्याचप्रमाणे सेवेतील कर्मचारी आणि कुटुंबीय यांना पोर्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाताना वडाळा रेल्वे स्थानककडून मोठा ब्रिज ओलांडून जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार हे फारच त्रासदायक होते. म्हणून युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये व जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे उपाध्यक्ष व बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांनी बोर्ड मीटिंगमध्ये मुंबई बंदराचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु यांच्याकडे वडाळा रेल्वे स्टेशनवरून पोर्ट रुग्णालयाकडे उपचाराकरिता जाण्या-येण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यास बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर यांनीही पाठिंबा दिला. अध्यक्षांनी ही मागणी तत्त्वत: मान्य केली. त्याप्रमाणे गाडी क्र. एमएच ०१ इइ ८६९७ ही गाडी सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत चालू केली आहे. ही गाडी वडाळा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर ४ वडाळा (पूर्व) रेनॉल्ड्स कॉलनी बिल्डिंग नंबर ३० जवळून निघून हॉस्पिटलला जाईल व पुन्हा त्याच ठिकाणी परत येईल. या गाडीमुळे हॉस्पिटलला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची सोय होणार आहे. मागणी मान्य केल्याबद्दल मुंबई बंदराचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथु आणि मुंबई पोर्ट रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अगरवाल यांना मुंबई पोर्टच्या सर्व कामगारांच्या वतीने आभार तसेच बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर यांनी योग्य मागणीचा पाठपुरावा करून सदर मागणी मान्य करून घेतल्याबद्दल सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
शिवडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.